प्रवासादरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने शिक्षिकेचे निधन
01:10 PM Sep 03, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
कणकवली / प्रतिनिधी
Advertisement
तळेरे येथून मुंबईला लक्झरीने जात असताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ओझरम येथील स्नेहल संतोष राणे (51) या शिक्षिकेचे उपचार सुरू असताना आकस्मिक निधन झाले. ही दुर्दैवी घटना बुधवार 3 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. स्नेहल यांना मधुमेहाचा आजार होता. औषध उपचारासाठी त्या मुंबई येथे पती संतोष राणे यांच्यासोबत जात होत्या. वाटेत लांजा- कुवेच्या दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.
Advertisement
Advertisement
Next Article