वेतोरे पालकरवाडी येथे शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
11:20 AM Jul 27, 2026 IST | तरुण भारत सिंधुदुर्ग
Advertisement
वेंगुर्ला : वेतोरे पालकरवाडी येथे एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. शिक्षकाचे नाव पांडुरंग बिराप्पा वगरे (वय ५०) असे असून ते मूळचे मंगळवेढा येथील रहिवासी होते. ते गेल्या १५ वर्षांपासून वेतोरे हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे, विद्यार्थ्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे आणि हसतमुख व्यक्तिमत्त्वामुळे ते विद्यार्थी, सहकारी शिक्षक आणि पालकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते.
Advertisement
Advertisement