सिंधुदुर्गातील तज्ज्ञ शिक्षकांना शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेचे आयोजन ; जिल्हयातील १४० शिक्षकांची निवड
डिगस । प्रतिनिधी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित स्टार्स व समग्र शिक्षा अंतर्गत प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर शिक्षक समृद्धी प्रशिक्षण २.० जिल्हास्तरीय प्रशिक्षण दि. ०३ ते ०७ फेब्रुवारी या कालावधीत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,ओरोस येथे होत आहे . या प्रशिक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्हयातील जवळजवळ १४० शिक्षकांची निवड झाली आहे .या प्रशिक्षणाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा डाएटचे प्राचार्य श्री राजेंद्र कांबळे,ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री आर पी जाधव,अधिव्याख्यात्या श्रीम स्नेहल पेडणेकर,तज्ञ मार्गदर्शक कर्पूरगौर जाधव, राजू वजराटकर, चंद्रकांत सावंत, नागेश कदम, प्रिती पांचाळ , पूर्वा शिरसाट , प्रताप यादव व प्रकाश कानुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात होणारे बदल, क्षमतांवर आधारित अध्ययन ,अध्यापन प्रक्रिया,तसेच इतर महत्वाच्या बदलांबाबत हे प्रशिक्षण असून येणाऱ्या महिनाभरात जिल्ह्यातील सर्व अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थामधील इयत्ता पहिली ते बारावीच्या शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच या प्रशिक्षणादरम्यान सर्व प्रशिक्षणार्थ्यांना जेवण आणि चहाची व्यवस्था केली होती. त्यामध्ये राज्यात प्रथम कोणत्याही प्रशिक्षणात कागदी कप आणि डिश ऐवजी स्टील चे कप आणि भांडी वापरली गेली.त्यामुळे या प्रशिक्षणातून पर्यावरण पूरक संदेश अप्रत्यक्षित्या देण्यात आला.