राज्यभरातील तज्ज्ञ शिक्षकांना शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण
सिंधुदुर्गातील १० शिक्षकांची निवड ; . २०ते २४ जानेवारीला लोणावळा येथे आयोजन
डिगस -
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित स्टार्स व समग्र शिक्षा अंतर्गत प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर शिक्षक समृद्धी प्रशिक्षण २.० राज्यस्तरीय प्रशिक्षण दि. २०ते २४ जानेवारी या कालावधीत सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेन्कॉलॉजी कुसगांव , लोणावळा येथे होत आहे . या प्रशिक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्हयातील दहा शिक्षकांची निवड झाली आहे .या प्रशिक्षणाचे उद्घाटन राज्य विकसन आराखडा प्रमुख राजेंद्र वाकडे, संशोधन विभागप्रमुख दत्तात्रय थिटे , पुणे डाएट प्रमुख प्रभाकर क्षिरसागर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे . या प्रशिक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून डाएट अधिव्याख्याता स्नेहल पेडणेकर व राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्पूरगौर जाधव, राजू वजराटकर, चंद्रकांत सावंत, नागेश कदम, प्रिती पांचाळ , पूर्वा शिरसाट , प्रताप यादव व प्रकाश कानुरकर आदी राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार असून पुढील टप्प्यात ते सिंधुदुर्ग जिल्हयातील शिक्षकांना प्रशिक्षित करणार आहेत.