अल्पवयीन मुलांना अमानुष मारहाण करणारा शिक्षक ताब्यात
05:18 PM Feb 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडीतील एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेतील प्रकार
Advertisement
सावंतवाडी -
सावंतवाडी शहरातील एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत १२ वर्ष वयोगटातील अल्पवयीन मुलांना काठीने अमानुष मारहाण करणारा शिक्षक अल्लाउद्दीन शेख (६४) रा . बाहेरचावाडा, सावंतवाडी याच्या विरोधात सावंतवाडी पोलीस स्थानकात बाल न्याय अधिनियम २०१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलांना काठीने मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेऊन त्या धार्मिक शिक्षण संस्थेतील शिक्षकावर कारवाईचा बडगा उगारला. या प्रकरणाचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर करीत आहेत.
Advertisement
Advertisement