For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाववर अन्याय केलेल्यांना योग्य धडा शिकवा

10:30 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाववर अन्याय केलेल्यांना योग्य धडा शिकवा
Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : बार असोसिएशन पदाधिकाऱ्यांची घेतली भेट

Advertisement

बेळगाव : हुबळी-धारवाडची तुलना केल्यास बेळगाव जिल्ह्यावर अन्याय झाला आहे. ही असमानता निर्माण करणाऱ्यांना उत्तर देण्याची हीच वेळ आहे. त्यांना योग्य उत्तर द्यावे, असे आवाहन महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. येथील बार असोसिएशन भवनमध्ये मंगळवारी लोकसभा निवडणुकीनिमित्त मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेमध्ये त्या बोलत होत्या. बेळगाव जिल्ह्यावर अन्याय केलेल्यांना जनता कधीही माफ करणार नाही. मुख्यमंत्री, जिल्हा पालकमंत्री ही पदे भूषवूनही जिल्ह्यासाठी कोणतेच भरीव योगदान दिले नाही. आता बेळगावला येऊन ते काय साध्य करणार आहेत? असा प्रश्न मंत्री हेब्बाळकर यांनी उपस्थित केला. जगदीश शेट्टर यांनी मुख्यमंत्री व जिल्हा पालकमंत्री असताना जिल्ह्यासाठी काहीही केलेले नाही. जिल्ह्यासाठी आलेल्या योजना हुबळी-धारवाडला वर्ग केल्या आहेत. हायकोर्टचे पीठ, आयआयआयटी, कोरोना काळात ऑक्सिजन सिलिंडर वितरणातही अन्याय केला आहे. असे असतानाही आता जनतेला खोटी आश्वासने दिली जात आहेत. केवळ सत्तेसाठी जिल्ह्याचा उपयोग करून घेणाऱ्यांना योग्य धडा शिकविला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार फिरोज सेठ यांनी बेळगावच्या विकासासाठी मृणाल हेब्बाळकर यांना निवडून द्यावे, असे आवाहन केले. यावेळी आमदार राजू सेठ, उमेदवार मृणाल हेब्बाळकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर, उपाध्यक्ष अॅड. बसवराज मुगळी, जनरल सेक्रेटरी अॅड. वाय. के. दिवटे, अॅड. आर. के. पाटील, अॅड. आर. पी. पाटील, अॅड. शीतल रामशेट्टी, अॅड. विनोद पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.