चहा उत्पादन ऑक्टोबरमध्ये 18 कोटी किलो, 12 टक्के वाढले
कोलकाता :
देशातील चहा उत्पादनामध्ये ऑक्टोबर महिन्यात 12 टक्के वाढ नोंदवली आहे. यामध्ये विशेष करून ग्रीन टीचे उत्पादन 21.4 लाख किलो इतके होते. देशातील चहाचे उत्पादन ऑक्टोबरमध्ये 12 टक्के वाढीसह 18.28 कोटी किलो इतके झाले आहे. मागच्या वर्षी याच महिन्यामध्ये 16.31 कोटी किलो इतक्या चहाचे उत्पादन घेण्यात आले होते. यामध्ये पश्चिम बंगाल या राज्याने ऑक्टोबर महिन्यामध्ये 5.49 कोटी किलो उत्पादन घेतले आहे. 2022 मध्ये याच महिन्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये 4.97 कोटी किलो घेतले होते. देशातील सर्वाधिक चहाचे उत्पादन घेणाऱ्या आसाम राज्याने 10.43 कोटी किलो इतक्या चहाचे उत्पादन घेतले आहे. मागच्या वर्षी याच महिन्यामध्ये आसाम राज्याने 9.07 कोटी किलो इतक्या चहाचे उत्पादन घेतले होते. दक्षिण भारतामध्ये पाहता चहाचे उत्पादन 1.88 कोटी किलो इतके झाले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये उत्पादनात काहीशी घसरण पाहायला मिळाली. चहाच्या प्रकारामध्ये पाहता सीटीसी प्रकारातील चहाचे उत्पादन ऑक्टोबर 2023 मध्ये 16.77 कोटी किलो इतके राहिले होते.