चहा लिलावाने गुवाहाटीमध्ये नोंदवला विक्रम
2024-25 मध्ये 17 कोटी किलो चहा विक्री : एकूण उलाढाल जवळपास 3,851 कोटींवर राहण्याचा अंदाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गुवाहाटी चहा लिलाव केंद्राने (जीटीएसी) 2024-25 या आर्थिक वर्षात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत चहाची विक्री जास्त झाल्याचे नोंदवले आहे. तसेच प्रति किलो सरासरी किमतीत वाढ झाली आहे. अधिकाऱ्यांनी या संदर्भात नुकतीच माहिती दिली आहे. लिलाव केंद्राशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, बाउट लीफ फॅक्टरीज (बीएलएफएस )द्वारे उत्पादित चहाला गेल्या आर्थिक वर्षात चांगले आणि फायदेशीर मूल्य मिळाले.
जीटीएसीने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सरासरी 169.13 दशलक्ष किलो चहा विकला. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही वाढ आहे, जेव्हा 166.34 दशलक्ष किलो चहा सरासरी 183.20 प्रति किलो दराने विकला गेला होता-म्हणजेच प्रति किलो 44.50 ची वाढ, असे गुवाहाटी चहा लिलाव खरेदीदार संघटनेचे सचिव दिनेश बिहानी म्हणाले. बिहानी म्हणाले की चालू आर्थिक वर्षात एकूण विक्री उलाढाल सुमारे 3,851 कोटी इतकी आहे. बीएलएफला वर्षभरात मजबूत आणि अनुकूल किमती मिळाल्या. यापैकी, बेजोपथार परिसरातील काही चहा प्रति किलो 471 पर्यंत विकला गेला. आसामच्या सर्व जिह्यांमध्ये, धेमाजी जिह्यातील बीएलएफला गेल्या आर्थिक वर्षात चहाची सर्वाधिक किंमत मिळाली.
लिलाव केंद्र त्यांच्या इन-हाऊस टी लाउंजद्वारे ‘सिंगल ओरिजिन’ आसाम चहाचा सक्रियपणे प्रचार करत आहे. हे लाउंज आता पर्यटकांसाठी अस्सल आणि उच्च दर्जाचा आसाम चहा खरेदी करण्यासाठी एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात, ईएस टी लाउंजने चहाच्या जाहिराती आणि किरकोळ विक्रीतून 1 कोटींपेक्षा जास्त उलाढाल नोंदवली आहे, असेही बिहानी यांनी सांगितले आहे.
सप्टेंबर तिमाहीत व्यवसाय कसा राहिला?
सप्टेंबर तिमाहीत चहा लागवड करणाऱ्या कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाल्याचे दिसून येते. यामुळे चहाच्या किमती वाढल्या आहेत. प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनावर परिणाम झाला, ज्यामुळे किमती वाढल्या. अनियमित पावसानंतर दीर्घकाळ दुष्काळ पडल्यामुळे, चहाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा सुमारे 7.67 कोटी किलो कमी होते. उत्तर भारतातील चहा उत्पादनात सुमारे 6.3 कोटी किलोचे नुकसान झाले, ज्यामुळे घाऊक किमतीत वाढ झाली. चहाच्या एकूण उत्पादनात उत्तर भारताचा वाटा 82 टक्क्यांहून अधिक आहे.
काय सांगते चहा मंडळाची आकडेवारी
चहा मंडळाच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की सप्टेंबर 2024 पर्यंत उत्तर भारतात सरासरी लिलाव किंमत 247.33 रुपये प्रति किलो होती, जी गेल्या वर्षाच्या याच कालावधीपेक्षा 23.98 टक्के जास्त आहे. दक्षिण भारतीय चहाची सरासरी किंमत 126.22 रुपये प्रति किलो होती, जी मागील वर्षाच्या तुलनेत 16.19 टक्के जास्त होती. त्याचप्रमाणे, चहाची अखिल भारतीय सरासरी किंमत 215.34 रुपये प्रति किलो होती, जी मागील वर्षाच्या तुलनेत 22.01 टक्के जास्त आहे.