For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीडीपी रालोआमध्ये सामील होण्याची शक्यता

06:44 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
टीडीपी रालोआमध्ये सामील होण्याची शक्यता
Advertisement

चंद्राबाबू नायडूंनी घेतली दिल्लीत अमित शहांची भेट

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू आणि अभिनेते-राजकारणी, जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युती होण्याच्या शक्मयतेवर त्यांनी चर्चा केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ओडिशातील सत्ताधारी बीजेडीही एनडीएमध्ये सामील होऊ शकते, असे स्पष्ट संकेत मिळत असतानाच आता भाजपने टीडीपीशीही बोलणी सुरू केल्याने भाजपच्या मित्रपक्षांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

टीडीपी हा आधी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा भाग होता. परंतु नायडू राज्याचे मुख्यमंत्री असताना 2018 मध्ये ते रालोआमधून बाहेर पडले होते. आता दोन्ही पक्ष हातमिळवणी करण्यास तयार आहेत, मात्र सर्व काही जागावाटपावर अवलंबून असल्याचे सूत्रांनी सांगितले. निवडणुका जवळ आल्याने याबाबत निर्णय घेण्यास विलंब लावणे योग्य नाही, असे टीडीपी नेत्यांनी म्हटले आहे. चंद्राबाबू नायडू यांनी यापूर्वी फेब्रुवारीमध्ये शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे ते ‘रालोआ’कडे वाटचाल करत असल्याची अटकळ निर्माण झाली होती. मात्र, अद्याप गोष्टी स्पष्ट झालेल्या नाहीत.

भाजप आणि बीजेडीचे नेते लोकसभा निवडणुकीत एकत्र लढण्याच्या निर्णयाला अंतिम रूप देण्याच्या मार्गावर आहेत. बुधवारी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या स्वतंत्र बैठका झाल्या. राज्यात लोकसभेच्या 25 आणि विधानसभेच्या 175 जागा आहेत. भाजप आठ ते दहा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.