For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीसीएसचा भरभक्कम नफा

06:18 AM Apr 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
टीसीएसचा भरभक्कम नफा
Advertisement

चौथ्या तिमाहीत नफा 13,718 कोटींचा

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने गुरुवारी आपल्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक 12 टक्क्यांनी वाढून 13,718 कोटींवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा नफा 12,224 कोटी रुपयांचा होता.

Advertisement

महसुलात 10 टक्क्यांनी वाढ

नफ्यासोबतच कंपनीचा महसूलही वाढला आहे. तिमाहीतील महसूल 10 टक्क्यांनी वाढून 70,698 कोटींवर पोहोचला आहे. या दमदार वाढीमागे 12 अब्ज डॉलर (अंदाजे 1 लाख कोटी) किमतीचे तीन मोठे करार कारणीभूत होते. कंपनीने आपल्या भागधारकांना प्रति शेअर 31 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे.

प्रत्येक क्षेत्रात दमदार कामगिरी : सीईओ

टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एमडी के. कृतिवासन यांनी निकालावर आनंद व्यक्त करताना ते म्हणाले की, ही सलग तिसरी तिमाही आहे ज्यात कंपनीने बरी वाढ नोंदवली आहे.

Advertisement
Tags :

.