टीसीएसची डेन्मार्कच्या रॅमबॉलसोबत भागीदारी
वृत्तसंस्था/ मुंबई
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने रॅमबॉल या डॅनिश जागतिक आर्किटेक्चर, अभियांत्रिकी आणि सल्लागार कंपनीसोबत मोठी धोरणात्मक भागीदारी केली आहे. याकरीता कंपनीने लाखो डॉलर्सचा करार सात वर्षांसाठी केला आहे.
यामुळे व्यवसाय वाढीला चालना मिळणार असल्याची माहिती उभय कंपन्यांकडून देण्यात आली आहे. धोरणात्मक भागीदारीचा एक भाग म्हणून, टीसीएस 12 देशांमधील रॅमबॉलच्या 300 हून अधिक आयटी कर्मचाऱ्यांना देखील ऑनबोर्ड करणार आहे.
कंपनीने कराराचा आकार उघड केला नाही, परंतु कंपनीचा मागोवा घेणाऱ्या विश्लेषकांनी सांगितले की हा व्यवहार टीसीएससाठी मोठ्या व्यवहारांच्या श्रेणीत असेल. टीसीएससाठी ही मोठी डील 100 दशलक्ष डॉलर आणि त्याहून अधिक श्रेणीत येते.
रॅमबॉलचे वरिष्ठ गट संचालक (मुख्य माहिती अधिकारी) थॉमस अँजेलियस म्हणाले, ‘आमच्या कंपनीने लक्षणीय वाढ अनुभवली आहे आणि हे यश भविष्यात कायम राहण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आमचा वाढीचा मार्ग पुढे चालू ठेवण्यासाठी, आम्ही एका विश्वासार्ह भागीदाराची गरज ओळखली जी आम्हाला एक प्रमाणित, स्केलेबल आयटी प्लॅटफॉर्म तयार करण्यात मदत करू शकेल जे नावीन्यपूर्णतेला अनुमती देते आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी पुरेसे गतिशील आहे.