टीसीएस देणार लाभांश
06:27 AM Jan 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
टाटा समुहातील आयटी क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आपल्या गुंतवणुकदारांना लाभांश देण्याची तयारी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार टीसीएस प्रति समभाग 11 रुपयेचा तिसरा अंतरिम लाभांश आणि प्रतिसमभाग 46 रुपयांचा विशेष लाभांश देणार असल्याचे सांगितले जात आहे. याचाच अर्थ कंपनी आपल्या गुंतवणुकदारांच्या खात्यामध्ये एकंदर 57 रुपयांचा लाभांश जमा करणार आहे. 17 जानेवारी 2026 पर्यंत ज्या समभागधारकांची नावे समाविष्ट असतील त्यांनाच लाभांश दिला जाणार आहे. डीव्हीडंडची रेकॉर्ड डेट 16 जानेवारी असणार आहे.
Advertisement
Advertisement