For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीसीएस ‘एआय’मध्ये शोधतंय संधी

06:48 AM Jun 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
टीसीएस ‘एआय’मध्ये शोधतंय संधी
Advertisement

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना आशा

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणतात की, पुढील तीन वर्षांत कंपनीत जेवढे कर्मचारी आहेत, जवळपास तेवढेच एआय एजंट काम करत असतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

कंपनीच्या 31 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला (एजीएम) संबोधित करताना चंद्रशेखरन म्हणाले की, टीसीएस सध्या आपल्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करत आहे. जगभरातील कंपन्या एआयमध्ये वेगाने गुंतवणूक करत आहेत आणि यामुळे टीसीएससाठी नवीन संधी निर्माण होत आहेत.

एआय व्यवहारांमधून वाढता महसूल

चंद्रशेखरन म्हणाले की, आर्थिक वर्ष 2025-26 च्या शेवटच्या तिमाहीत टीसीएसचा एआय व्यवसाय वार्षिक आधारावर 2.4 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. ही उलाढाल प्रत्येक तिमाहीत सरासरी 22.4 टक्के दराने वाढत आहे. एआय-संबंधित प्रकल्पांची मागणी सातत्याने वाढत आहे आणि त्याचा परिणाम कंपनीच्या व्यवसायात स्पष्टपणे दिसून येत आहे.

5 प्रमुख संधी उदयास

टीसीएस प्रमुखांच्या मते, कंपनीला एआयच्या युगात 5 प्रमुख संधी दिसत आहेत. यामध्ये मोठ्या कंपन्यांच्या जुन्या तंत्रज्ञान प्रणालींचे आधुनिकीकरण करणे, व्यावसायिक प्रक्रियांची पुनर्रचना करणे, कंपन्यांमध्ये एआयचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करणे व रोबोट्समध्ये एआयचा वापर वाढवणे यांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.