For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

टीसीएसने तिमाहीत कमावला 13884 कोटींचा नफा

06:01 AM Oct 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
टीसीएसने तिमाहीत कमावला 13884 कोटींचा नफा
Advertisement

मुंबई : टीसीएस अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांनी आपल्या आर्थिक वर्ष 2027 च्या दुसऱ्या तिमाहीचा निकाल गुरुवारी जाहीर केला आहे. या निकालानुसार कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 15 टक्के वाढीसह 13,884 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. कंपनीने लाभांशाचीही घोषणा केली आहे.

Advertisement

टीसीएसचा एकत्रित निव्वळ नफा 13884 कोटी रुपयांचा झाला आहे, जो मागच्या वर्षी याच अवधीत 12075 कोटी रुपये इतका होता. याचप्रमाणे कंपनीने 11 टक्के वाढीसह 73,188 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. एक वर्षआधी पाहता कंपनीने 65,799 कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता.

याचदरम्यान कंपनीने संचालक मंडळाने प्रत्येक समभागावर 12 रुपयांचा दुसरा अंतरीम लाभांश देण्याची घोषणा केली. यासाठी पात्रताधारक समभागधारकांसाठी 14 ऑक्टोबर 2026 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. हा लाभांश गुंतवणूकदारांना 30 ऑक्टोबर पासून खात्यात दिला जाणार आहे.

Advertisement

एआयचा व्यवसाय

टीसीएसने जुलै ते सप्टेंबर अवधीत 3.1 अब्ज डॉलर्स मूल्याचा एआय व्यवसाय केला आहे. ही रक्कम टीसीएसच्या एकूण महसूलाच्या तुलनेत 10 टक्के अधिक आहे. या तिमाहीत कंपनीचे कंत्राटाचे मूल्य 9.6 अब्ज डॉलर्सचे होते.

कर्मचाऱ्यांची संख्या

सप्टेंबरअखेर पाहता टीसीएसमध्ये 5 लाख 98 हजार 56 इतके कर्मचारी होते. गेल्या 12 महिन्यांमध्ये यांच्या आयटी सेवेतील कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण 13 टक्के इतके होते.

Advertisement
Tags :

.