टीसीएसची आता भारतीय बाजारावर नजर
उत्पन्न दुप्पट करण्याकडे कंपनीचा कल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी आयटी सेवा देणारी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) भारतासह उदयोन्मुख बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करत आहे. जागतिक अनिश्चिततेमुळे सुरू असलेल्या अशांततेचा सामना करण्यास मदत होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
या अगोदरच कंपनीने आपल्या नेतृत्वात बदल केला आहे. नवीन बदलत्या स्थितीनुसार भारत, लॅटिन अमेरिका, न्युझीलंड, आशिया प्रशांत, पश्चिम आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यासारखे देश हे सध्याला पुन्हा नव्याने उभरणाऱ्या बाजारांपेठांमध्ये समावेश होत आहेत. तेव्हा या देशात कंपनी आपला व्यवसाय वाढावा यासाठी प्रयत्न करणार आहे.
टीसीएसने या नव्या रणनीतीला चालना देण्यासाठी नेतृत्व करण्यास गिरीष रामचंद्रन यांना अध्यक्ष पदावर नियुक्त केले आहे. या अगोदर आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये कंपनीच्या व्यवसायाचे नेतृत्व ते करत होते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सामूहीक पातळीवर असे मानले जाते की, कंपनीसाठी भारत एक मोठी बाजारपेठ राहणार आहे. यामध्ये ब्लिट्ज 2024 मधील मुख्य मुद्यांचाही समावेश होणार आहे. तसेच एन चंद्रशेखरन यांनी म्हटले होते की, कंपनीला भारतीय बाजारात अधिकचे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. यामुळे आगामी नियोजन हे अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले एमडी
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के कृतिवासन यांनीही आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विशेष संभाषणात या गोष्टींचा खुलासा केला. ते म्हणाले, ‘भारतात आमच्यासोबत वाढीसाठी सरकार आहे आणि दोन्हीकडे ग्राहक आहेत. आम्ही मोठ्या सार्वजनिक सेवा प्रकल्पांसाठी सरकारसोबत भागीदारी केली आहे.’
कृतिवासन म्हणाले, ‘आम्ही सार्वजनिक क्षेत्रातील जवळपास सर्व मोठ्या बँकांसोबत काम करत आहोत. येथे आम्ही बीएफएसआय क्षेत्राशी अधिक जोडलेले आहोत, परंतु आता आमचे लक्ष या क्षेत्राच्या पलीकडे जाण्यावर आहे.’ ‘उभरत्या बाजारपेठांची कहाणी केवळ भारतापुरती मर्यादित नाही. आसियान देशांमध्येही आम्ही करार केले आहेत. आता त्याची व्याप्ती केवळ सिंगापूर आणि हाँगकाँगपुरती मर्यादित नाही. आम्ही मलेशिया आणि थायलंडमध्येही उल्लेखनीय कामे करुन तिथे व्यवसाय वाढवला आहे.
कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, वर्षभरापूर्वीच्या तुलनेत भारतात 20.3 टक्के, लॅटिन अमेरिकेत 21.1 टक्के, पश्चिम आशिया आणि आफ्रिकेत 14.8 टक्के आणि आशिया पॅसिफिकमध्ये 4 टक्के वाढ झाली आहे. या तुलनेत अमेरिकेत 2.3 टक्के आणि ब्रिटनमध्ये 17.7 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीतही ही वाढ कायम राहिली. आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत, भारतीय बाजाराने एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत स्थिर चलनात 61.8 टक्के वाढ नोंदवली. दुसऱ्या तिमाहीत 95.2 टक्के वाढीसह भारत अग्रगण्य बाजारपेठ राहिला. ही वाढ प्रामुख्याने बीएसएनएल डीलमुळे झाल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले आहे.
कंपनीचे भारतीय बाजारातील योगदान
आर्थिक वर्ष 2024 च्या अखेरीस कंपनीच्या एकूण उत्पन्नात भारतीय बाजाराचे योगदान 5.6 टक्के होते. त्या वर्षी कंपनीचे भारतीय बाजारातून एकूण उत्पन्न 13,562 कोटी रुपये होते. गेल्या 18 महिन्यांमध्ये कंपनीचा भारतीय बाजारातून महसूल सुमारे 23,977 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. टीसीएसचे नेतृत्व भारतीय बाजारातून मिळणारे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करत आहे.