For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टॅक्सी सेवा कंपनी रॅपिडो करणार व्यवसाय विस्तार

06:32 AM Mar 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
टॅक्सी सेवा कंपनी रॅपिडो करणार व्यवसाय विस्तार
Advertisement

500 शहरात करणार विस्तार : सहसंस्थापक पवन गुंटूपल्ली यांची माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑनलाइन टॅक्सी सेवा देणारी रॅपिडोचे सहसंस्थापक पवन गुंटूपल्ली यांनी भारतात यावर्षी जवळपास 500 शहरांमध्ये व्यवसाय विस्तार करण्याची योजना आखली असल्याचे म्हटले आहे. परिवहन क्षेत्रातल्या वाढत्या संधींचा लाभ उठवण्यासाठी कंपनी आगामी काळात व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करणार आहे.

Advertisement

आयपीओ आणणार

यायोगे कंपनी येत्या काळात आपला आयपीओही लाँच करु शकते, तसे संकेतही सहसंस्थापकांनी व्यक्त केले आहेत. रॅपिडोला चांगला प्रतिसाद लाभत असून चांगल्या भांडवलासह व एकंदर बाजारातील स्थितीचा अंदाज बांधत आयपीओ सादरीकरणाबाबतचा निर्णय कंपनी लवकरच घेणार असल्याचेही पवन गुंटूपल्ली यांनी म्हटले आहे.

33 लाख जणांचा प्रवास

सध्याला कंपनीचे उद्दिष्ट विकासावर आहे. रॅपिडो आपल्या ऑटो, बाईक टॅक्सी आणि कॅब सेवांद्वारे दररोज जवळपास 33 लाख लोकांना सुखरुप प्रवासाची संधी देत आहे. दुचाकी आणि तीचाकी उद्योगात आम्ही बऱ्यापैकी यश मिळवलं असून येणाऱ्या काळात चारचाकी व्यवसायातही कंपनी उत्तम प्रदर्शन करेल. वरीलप्रमाणे 33 लाख प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी म्हणजे जवळपास 15 लाख जणांनी दुचाकी सेवेचा लाभ घेतलेला आहे. 13 लाख जणांनी तिचाकीतून तर 5 लाख प्रवशांनी चारचाकी सेवेचा लाभ घेतला आहे.

आंध्र, तेलंगाणात सुरुवात

साधारण वर्षापूर्वी चारचाकीच्या सेवेत उतरलो आहोत आणि आम्ही ज्या नवकल्पना राबवल्या आहेत त्याने या सेवेला चांगली गती घेता आली असल्याचे ते म्हणाले. विस्ताराचा विचार करताना सुरुवातीच्या टप्प्यात आंध्र प्रदेश आणि तेलंगाणात सेवा विस्तार करण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.