टॅक्सी मालकांना भरावा लागणार जीएसटी
10:28 AM Oct 19, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
तब्बल 263 टॅक्सीमालकांना नोटिसा जारी
Advertisement
पणजी : व्यापारी कर विभागाने 263 पर्यटक टॅक्सी मालकांना जीएसटी नोंदणी न केल्यामुळे नोटिसा बजावल्या आहेत. चारपेक्षा जास्त टॅक्सी असलेल्या चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटिसा बजावण्याची प्रक्रिया जवळपास तीन महिन्यांपूर्वी सुरू झाली होती आणि ती सुरूच आहे. विशेष म्हणजे विभागाकडे 14 टॅक्सी असलेला एकच मालक समोर आला आहे. टॅक्सी मालकाचे वार्षिक उत्पन्न 20 लाखांच्या पुढे गेल्यावर त्यांनी जीएसटी अंतर्गत नोंदणी करावी. किमान 5 टॅक्सी असेलेल्या मालकाचे वर्षाला 20 लाखांचे उत्पन्न पार करेल. पर्यटक टॅक्सी, पिवळ्या-काळ्या टॅक्सी, भाड्याच्या टॅक्सीसह एकूण टॅक्सी किती आहेत याचा अहवाल व्यापार कर विभाग वाहतूक खात्याकडून मागवत आहे. त्यांनी आयकर भरला की नाही, किती आयकर भरला याचा आढावा घेतला जात आहे.
Advertisement
Advertisement
Next Article