For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वॉशिंग मशिन-एसी सारख्या उत्पादनांवर कमी होणार कर

06:44 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
वॉशिंग मशिन एसी सारख्या उत्पादनांवर कमी होणार कर
Advertisement

वित्त मंत्रालयाकडे यादी पाठवली : कागद, फर्निचर, सोलर ग्लास यांचाही होणार समावेश

Advertisement

नवी दिल्ली :

फर्निचर, वॉशिंग मशिन, सोलर ग्लास आणि एअर प्युरिफायर यांसारख्या विशिष्ट उत्पादनांसाठी सरकार शुल्क आकारणी दरात बदल करण्याचा विचार करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकार कागद, फर्निचर, वॉशिंग मशीन, सोलर ग्लास आणि एअर प्युरिफायर यांसारख्या उत्पादनांवरील शुल्क कमी करणार आहे.

Advertisement

उत्पादनांची यादी वित्त मंत्रालयाकडे पाठवली

एका अधिकाऱ्याने सांगितले की, उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने शुल्क संरचनेच्या मुद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अनेक उत्पादनांची यादी वित्त मंत्रालयाशी शेअर केली आहे. इंडस्ट्री असोसिएशन आणि एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल यांच्याशी सखोल चर्चा केल्यानंतर ही यादी अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आली आहे.

बदलानंतर निर्यात वाढेल

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, उलट शुल्क रचना महाग इनपुट उत्पादने महाग करते आणि उत्पादकांना निर्यात बाजारात स्पर्धा करण्यास असमर्थ बनवते. देशांतर्गत बाजारपेठेत अशा उत्पादनांची आयात स्वस्त होण्याचा धोका आहे. हा कर बदल देशांतर्गत निर्यातदारांना स्पर्धा करण्यास मदत करेल आणि त्या बदल्यात, शिपमेंट वाढवेल आणि उत्पादनाला चालना देईल.

Advertisement
Tags :

.