कर विभागाची टाटा स्टीलला नोटीस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा स्टीलला आयकर विभागाकडून 1,007 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) चा गैरवापर केल्याबद्दल नोटीस दिली आहे. ही नोटीस 2018-19 ते 2022-23 या आर्थिक वर्षासाठी आहे. कंपनीने रविवारी 29 जून रोजी स्टॉक एक्सचेंजला ही माहिती दिली.27 जून रोजी रांची येथील केंद्रीय कर आयुक्त (ऑडिट) यांच्या कार्यालयातून आलेल्या या सूचनेत, टाटा स्टीलला जमशेदपूर येथील केंद्रीय जीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्काच्या अतिरिक्त/संयुक्त आयुक्तांसमोर 30 दिवसांच्या आत हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
टाटा स्टीलने म्हटले आहे की, या नोटीसचा कंपनीच्या आर्थिक, कामकाज आणि इतर कामांवर परिणाम होणार नाही. कंपनीचे बाजारमूल्य 2.02 लाख कोटी रुपये आहे. वास्तविक थकबाकी असलेला जीएसटी 493 कोटी टाटा स्टीलने स्पष्ट केले की त्यांनी सामान्य व्यवसायादरम्यान यापूर्वी 514.19 कोटी रुपये जीएसटी भरला आहे. कंपनी म्हणते की या नोटीसमध्ये ही रक्कम समायोजित करण्याचा प्रस्ताव आहे, त्यामुळे प्रत्यक्षात थकबाकी असलेला जीएसटी फक्त 493.35 कोटी रुपये आहे.
टाटा स्टीलकडून उत्तर
कंपनीचा असा विश्वास आहे की, ही सूचना निराधार आहे. कंपनी योग्य वेळेत या नोटीसीला उत्तर देईल. टाटा स्टीलने असेही म्हटले आहे की, या सूचनेचा कंपनीच्या आर्थिक, ऑपरेशनल आणि इतर कामांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट केले आहे.