For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ टाटा’च्या ‘सियारा’ला दणकेबाज प्रतिसाद

06:42 AM Dec 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘ टाटा’च्या ‘सियारा’ला दणकेबाज प्रतिसाद
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

ऑटो मोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटाच्या सियाराला ग्राहकांनी सादरीकरणाच्या पहिल्याच दिवशी दणकेबाज प्रतिसाद दिला. कंपनीने सांगितले की, सादरीकरणाच्या पहिल्याच दिवशी 70 हजार ग्राहकांनी सदरची गाडी बुक केली आहे. या शिवाय साधारणपणे 1 लाख 35 हजार ग्राहकांनी गाडी घेण्यासंदर्भात आशावाद व्यक्त केला आहे.

टाटा मोटर्सने अलीकडेच सियारा ही सुधारीत आवृत्तीची एसयुव्ही गटातील विविध वैशिष्ट्यांनी युक्त कार लाँच केली होती. 11.49 लाख ते 21.49 लाख  रुपये एक्स शोरुम या गाडीची किंमत असून सदरची गाडी बुक करण्यासाठी ग्राहकांना आगाऊ स्वरुपात 21 हजार रुपये भरावे लागत आहेत. सदरची एसयूव्ही गटातील ही नवी गाडी पेट्रोल आणि डिझेल या दोन इंधनाच्या पर्यायासह सादर करण्यात आली आहे. ह्युंडाई क्रेटा, किया कॅरेन्स क्लाव्हीस, मारुती ग्रँड व्हिटारा आणि टोयोटाच्या हायरायडर या गाड्यांना सियारा टक्कर देईल.

Advertisement

विश्वचषक विजेत्या महिला संघाला भेट

आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धा जिंकलेल्या भारतीय महिला क्रिकेट खेळाडुंना टाटाची नवी सियारा भेट देण्यात आली आहे. सदरची गाडी मुंबईमध्ये समारंभामध्ये दिली. त्यावेळी वरिष्ठ कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.