For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटाची नेक्सॉन प्युअर प्लस पीएस बाजारात

06:08 AM May 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
टाटाची नेक्सॉन प्युअर प्लस पीएस बाजारात
Advertisement

किमत 10 लाखापर्यंत : अनेकविध वैशिष्ठ्यांचा असणार समावेश

Advertisement

वृत्तसंस्था, दिल्ली

प्युअर प्लस पीएस ही टाटा नेक्सॉनची नवी कार नुकतीच नव्या वैशिष्ट्यांसह बाजारात दाखल झाली आहे. या कारची सुरुवातीची किंमत 10 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Advertisement

यामधील पेट्रोल एमटी व्हेरियेंट कारची एक्स शोरूम किंमत 9.59 लाख रुपये ठेवली गेली असल्याचे समजते. अलीकडेच टाटाच्या नेक्सॉन या कारने विक्रीत नवा विक्रम प्रस्थापित करताना दहा लाख कार विक्रीचा विक्रमी टप्पा पार केला आहे. स्पोर्टस युटिलिटी व्हेईकल म्हणजेच एसयूव्ही गटामध्ये सर्वात लोकप्रिय कार म्हणून तिचा गौरव करण्यात आला आहे.

विविध मॉडेल्स आणि किमती

नवी दाखल झालेली कंपनीची एसयूव्हीची ही कार पेट्रोल, ड्युअल सिलेंडर आय सीएनजी आणि डिझेल सारख्या इंजिन पर्यायासह सादर करण्यात आली आहे. पेट्रोल एमटीची किंमत 9.59 लाख रुपये, पेट्रोल एएमटीची किंमत 10.14 लाख रुपये, ट्वीन सिलेंडर आय सीएनजी एमटीची किंमत 10.39 लाख रुपये, डिझेल एमटी मॉडेलची किंमत 10.54 लाख रुपये आणि डिझेल एएमटीची किंमत 11.19 लाख रुपये ठेवण्यात आली असल्याचे समजते.

ही असतील वैशिष्ट्यो

सदरच्या कारमध्ये वॉइस असिस्टेड पॅनोरमिक सनरुफ दिला गेला आहे. यासोबतच 10.25 इंचाचा हरमन टच क्रीन वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्लेसोबत देण्यात आला आहे. सहा स्पीकरची ऑडिओ सिस्टीम, महामार्गावर गाडी चालवताना क्रूझ कंट्रोलची सिस्टीम, रेन सेंसिंग वायपर, ऑटोमॅटिक एलईडी हेडलाइट्स, डायनामिक गाईडलाईन आणि पार्किंग सेन्सरयुक्त एचडी रिव्हर्स कॅमेरा, एलईडी टेल लॅम्प अशा विविध वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.