For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटाची नवी एरीस 25 तारखेला होणार लाँच

06:45 AM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
टाटाची नवी एरीस 25 तारखेला होणार लाँच
Advertisement

डिझायर, अमेझला देणार टक्कर :अनेक सुविधा असणार

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सची नवी गाडी एरीस येत्या 25 तारखेला लाँच होणार असल्याची माहिती आहे. सदरची कार ही बाजारात उपलब्ध टिगोरची सुधारीत आवृत्ती असल्याचे समजते. ही कार लाँच झाल्यावर आधीच बाजारात असणाऱ्या डिझायर, ह्युंडाईची ऑरा व अमेझ यांना टक्कर देईल.

Advertisement

नवी टाटा एरीसच्या डिझाइनमध्ये काहीसा बदल करण्यात येऊ शकतो. कारची समोरची बाजू आधीपेक्षा खूप आधुनिक असू शकते, असे म्हटले जात आहे. यात सपाट हेडलाइट, नवा मोठा बंपर मिळू शकतो. कारच्या बाजुला व मागच्या बाजुला काही बदल अपेक्षीत आहेत. नव्या कारमध्ये नव्या डिझाइनचे अलॉय व्हील, टेल लाइट व नवा रियर बंपर मिळू शकतो. एरीसमधील अंतर्गत भाग हा टियागोपासून प्रेरणा घेऊन डिझाइन करण्यात आल्याचे कळते.

या असणार सुविधा

यात 10.25 इंचाचा टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो व अॅपल कारप्लेसारख्या सुविधा असतील. याखेरीज डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, नवे स्टीयरिंग व्हील, 360 डिग्रीचा कॅमेरा, वायरलेस फोन चार्जिंग, टाइप सी चार्जिंग पोर्ट अशा सुविधाही यात असतील. पेट्रोल व सीएनजी या दोन इंधन प्रकारात ही गाडी येऊ शकते. पेट्रोल प्रकारातील गाडी 1.2 लिटर इंजिनची असेल. 5 स्पीड मॅन्युअलसह ऑटोमेटीकगियरबॉक्स मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement

.