टाटाची हॅरियर ईव्ही गाडी लाँच
किंमत 21.49 लाख : विविध वैशिष्ठ्यांचा समावेश
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत मिड साइज इलेक्ट्रिक एसयूव्ही हैरियर ईवी लॉन्च केली आहे. कार 65केडब्लूएच आणि 75 केडब्लूएच बॅटरी पॅकसह सादर केली गेली. कंपनीचा दावा आहे की एकदा चार्ज केल्यानंतर 62 किलोमीटर अंतर कापू शकेल. कंपनीने हॅरियर ईव्हीला वेरिएंट-एडवेंचर, फीरलेस आणि एम्पावर्डमध्ये सादर केले आहे. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 21.49 लाख रुपये आहे. विक्रीला 2 जुलैपासून सुरूवात होईल, असे समजते. कार ऑल व्हील ड्राइव्ह ऑप्शनसह येणार असून ऑफरोडिंग मोड्ही यात दिले गेले आहे. 360 डिग्री कॅमेरासह ट्रान्सपरेंट मोड, बूस्ट मोड आणि रॉक क्रॉल मोड जसे ऑफ-रोडिंग फीचर्स समाविष्ट आहेत. सुरक्षेसाठी 7 एअरबॅगसोबत अॅडव्हान्स ड्राइव्हिंग असिस्ट सिस्टम मिळणार आहे.
- कार किंमत (एक्स-शोरूम ऑल इंडिया) 21.49 लाख रुपये ठेवली आहे. कार्यक्रमात शेल्थ एडिशन देखील सादर केली.
- डिझाईन : एलईडी हेडलाइट आणि कनेक्टेड एलईडी डीआरएल या गाडीत असून काही सौंदर्यवर्धक बदल गाडीत केले गेले आहेत.
ही वैशिष्ट्यो...
या कारमध्ये अनेक ईवी स्पेसिफिक फीचर देखील दिलेले आहेत. व्ही2एल ऑफ-रोड असिस्ट, 360-डिग्री कॅमेरासह ट्रान्सपेरेंट मोड, बूस्ट मोड, रॉक क्रॉल आणि मड रट्स मोड समाविष्ट आहेत.