टाटाची पहिली ईव्ही कर्व्ह कार लाँच
15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 150 किमी धावणार असल्याचा दावा
नवी दिल्ली :
टाटा मोटर्सने 7 ऑगस्ट रोजी भारतातील पहिली कूप एसयूव्ही कर्व्ह ही गाडी लाँच केली आहे. ज्याची सुरुवातीची किंमत ही 17.49 लाख रुपये असल्याची माहिती आहे. इलेक्ट्रिक पेट्रोल आणि डिझेल इंजिन हा पर्याय असणारी ही भारतीय बाजारातील पहिली कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. मात्र पेट्रोल व डिझेल या आवृत्तींच्या किंमती अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.
टाटाचा दावा आहें, की कर्व्हची इलेक्ट्रिक आवृत्ती 1 रुपयात 1 किमी धावणार आहे. ती 15 मिनिटाच्या चार्जिगंमध्ये जवळपास 150 किमी इतकी धावू शकणार असल्याचे म्हटले आहे. कारमध्ये 6 एअरबॅग्स 360 डिग्री कॅमेरा व एडीएएससारखी प्रगत सुरक्षा असणारी वैशिष्ट्यो उपलब्ध होणार असल्याचेही सांगितले आहे. या गाडीचे बुकिंग 12 ऑगस्टपासून सुरु होणार असल्याची माहिती आहे.
कर्व्ह ईव्हीची स्पर्धा एमजी झेडएस ईव्ही आणि आगामी ह्युंहाई क्रेटा ईव्ही यांच्यासोबत राहणार आहे. त्याचवेळी आयसीइ प्रणित वक्र सिट्रोएन बेसाल्टशी टक्कर देणार आहे.
टाटा कर्व्ह पाच कलरमध्ये होणार उपलब्ध होणार असून याची किंमत ही 17.49 लाख रुपयांच्या एक्स शोरुमच्या सुरुवातीच्या किंमतीपासून सुरु होत आहे. टॉप मॉडेलची किंमत 21.99 लाख रुपयांपर्यंत जाणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. यासोबतच गाडीमध्ये विविध प्रकाराची अत्याधुनिक सुविधांयुक्त फिचर्स उपलब्ध होणार आहेत.