‘टाटा’ची देशातील पहिली ऑटोमॅटिक सीएनजी कार लाँच
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
टाटाने देशातील पहिली स्वयंचलित सीएनजी कार लाँच केली. टीयागो 7.89 लाखांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध, 28.06 केएमपीएल मायलेजचा दावा. टाटा मोटर्सने सीएनजी इंधन पर्याय आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह एंट्री लेव्हल हॅचबॅक टियागो आणि सेडान टिगोर लाँच केले आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या या दोन्ही भारतातील पहिल्या सीएनजी कार आहेत आणि त्या ट्विन सिलेंडर तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. याशिवाय दोन्ही वाहनांच्या डिझाईन आणि इतर वैशिष्ट्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. टाटा मोटर्सचा दावा आहे की दोन्ही कार स्वयंचलित ट्रांसमिशनसह सीएनजी मोडमध्ये 28.06 किमी/किलो मायलेज देतील. तुम्हाला पेट्रोल मोडमध्ये 20 केएमपीएल मायलेज मिळेल. टीयागो कार मारुती सिलेरिओ, मारुती वॅग्नार आणि सिट्रोन सी 3 सोबत स्पर्धा करते, तर टीगोर मारुती डेझिर, होंडा अॅमेझ आणि ह्युंडाई अॅरोसोबत स्पर्धा करते. टियागोसाठी टोर्नाडो ब्लू, टियागो एनआरजीसाठी ग्रासलँड बेज आणि टिगोरसाठी उल्का कांस्यसारखे नवीन रंगात मॉडेल्स उपलब्ध होणार आहेत. यामध्ये 21,000 रुपये टोकन भरुन गाडी बुक करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.