For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटाचे इको-प्रेंडली, मारुतीचे वॅग्नाआर फ्लेक्स मॉडेल सादर

06:49 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
टाटाचे इको प्रेंडली  मारुतीचे वॅग्नाआर फ्लेक्स मॉडेल सादर
Advertisement

भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये विविध मॉडेल्सचे सादरीकरण : प्रदर्शनाचा आज होणार समारोप

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू झाला आहे. हा देशातील पहिला मेगा मोबिलिटी शो आहे. 3 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात ऑटोमोबाईल क्षेत्रातील संशोधन, संकल्पना आणि उत्पादनांचे प्रदर्शन होणार आहे. जगभरातील उल्लेखनीय तंत्रज्ञान आणि वाहन कंपन्यांसह 50 हून अधिक देशांतील 600 हून अधिक प्रदर्शक यात सहभागी होत आहेत.

Advertisement

चला जाणून घेऊया सादर झालेल्या कारबद्दल...टाटा मोटर्स 8 इको-फ्रेंडली वाहने

टाटा मोटर्सने 8 इको-फ्रेंडली प्रवासी वाहने सादर केली आहे. पहिल्या दिवशी, टाटा मोटर्सने कर्व्ह एसयूव्ही कूपचे उत्पादन मॉडेल सादर केले आहे. याशिवाय कंपनीने 8 पर्यावरणपूरक प्रवासी वाहने सादर केली. यामध्ये नेक्सॉन आयसीएनजी, न्यू सफारी डार्क एडिशन कॉन्सेप्ट, टाटा कर्व्ह कॉन्सेप्ट, अल्ट्रोझ रेसर कॉन्सेप्ट, टाटा सफारी, पंच इव्ह, नेक्सॉन इव्ह डार्क एडिशन, हॅरियर इव्ह कॉन्सेप्ट यांचा समावेश आहे.

टाटा कर्व 1.5-लिटर डिझेल इंजिनसह येईल

टाटाने कर्व्हचे आयसीइ मॉडेल सादर केले आहे. यात टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट प्रमाणेच इंजिन आणि ट्रान्समिशन सेटअप मिळेल. आगामी कर्व्ह एसयूव्ही कूपच्या आयसीइ आवृत्तीमध्ये 1.5-लिटर 4-सिलेंडर डिझेल इंजिन मिळेल, जे 113बीएचपी पॉवर आणि 260एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी, ते 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडले जाईल.

टाटा नेक्सॉन आयसीएनजी संकल्पना मॉडेल उघड केले. टाटा नेक्सॉनचे आयसीएनजी संकल्पना मॉडेल उघड केले आहे. हे वाहन ट्विन-सिलेंडर तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. टाटा नेक्सॉनचे आयसीएनजीला 1.2-लिटर 3-सिलेंडर टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन मिळेल, जे 118बीएचपी पॉवर आणि 170 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.

नेक्सॉन आयसीएनजी थेट सीएनजीवरही

नेक्सॉन आयसीएनजी थेट सीएनजीवरही धावू शकते. टाटा नेक्सॉनच्या सीएनजी मॉडेलमध्ये सिंगल इंजिन कंट्रोल युनिट वापरण्यात आले आहे. यासह कार थेट सीएनजीवरही धावू शकते. सीएनजी कमी झाल्यावर, कार आपोआप पेट्रोल मोडवर शिफ्ट होईल.

मारुती सुझुकीची दोन कन्सेप्ट वाहने

मारुतीने आपली पहिली संकल्पना इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘ईव्हीएक्स‘ आणि वॅगन-आर फ्लेक्स-इंधन मॉडेल एक्सपोमध्ये प्रदर्शित केले आहे. गेल्या वर्षी ऑटो एक्सपोमध्ये या दोन्ही कारचे पहिल्यांदाच अनावरण करण्यात आले होते. मारुती सुझुकी इव्हीएक्स बद्दल बोलायचे झाले तर, ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार आहे, जी या वर्षाच्या अखेरीस लॉन्च केली जाऊ शकते.

Advertisement
Tags :

.