For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटाकडून वाहनांच्या किंमतीत कपात

06:01 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
टाटाकडून वाहनांच्या किंमतीत कपात
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी टाटा मोटार्स यांनी आपल्या काही कार्सच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सफारी, हॅरियर आणि नेक्सॉन यासारख्या गाड्या ग्राहकांना सवलतीत खरेदी करता येणार आहेत. ही सवलत ग्राहकांना एमवाय 2023 पेट्रोल, डिझेल आाणि सीएनजीसह पॉवर ट्रेनयुक्त कार्सवर मिळू शकणार आहेत.

मागच्या वर्षी बाजारात आलेली टाटा सफारी ही गाडी 1.25 लाख रुपयांच्या सवलतीत दिली जात आहे. कंपनीने टाटा हॅरियरच्या किंमतीमध्येसुद्धा 1.25 लाख रुपये सवलत दिली आहे. या सोबतच टाटाने नेक्सॉनच्या कारवरदेखील सवलत देण्याचे ठरविले आहे. पेट्रोलवर आधारित कारवर 90 हजार रुपये आणि डिझेलच्या कारवर 75 हजार रुपयांची सवलत कंपनी देऊ करते आहे. याप्रमाणे पेट्रोलवर आधारित टीयागोवर 85 हजार रुपये आणि सीएनजीवर आधारित गाडीवर 80 हजार रुपयांची सवलत मिळणार आहे. कंपनीची अल्ट्रोज ही कारसुद्धा 50 ते 65 हजार रुपयांपर्यंत सवलतीसह उपलब्ध करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.