टाटाही 1 सप्टेंबरपासून किमती वाढवणार
10:27 PM Aug 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : ह्युंडाई मोटर इंडिया या वाहन निर्मात्या कंपनीने नुकतीच 1 सप्टेंबरपासून वाहन किमतीत 1 टक्का इतकी वाढ घोषित केलेली होती. त्यापाठोपाठ आता टाटा मोटर्सनेही आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 सप्टेंबरपासून टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेडच्या वाहनांच्या किमती कमाल 25 हजार रुपयांपर्यंत वाढणार आहेत.
Advertisement
Advertisement