For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘टाटा’ पेगाट्रॉनचा आयफोन प्रकल्प खरेदी करणार

06:27 AM Nov 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘टाटा’ पेगाट्रॉनचा आयफोन प्रकल्प खरेदी करणार
Advertisement

दोन कंपन्यांमधील प्रगत टप्प्यातील चर्चा : मागील वर्षी विस्ट्रॉनचा प्रकल्प घेतला विकत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

टाटा इलेक्ट्रॉनिक्स तैवानी करार उत्पादक पेगाट्रॉनच्या भारतातील एकमेव आयफोन प्रकल्पामधील बहुसंख्य भागभांडवल विकत घेण्याची योजना आखत आहे. पेगाट्रॉनचा हा प्रकल्प तामिळनाडूमध्ये आहे. हे एक नवीन संयुक्त उपक्रम तयार करणार असून जे अॅपल पुरवठादार म्हणून टाटाचे स्थान मजबूत करणार असल्याची अपेक्षा आहे.

Advertisement

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, दोन्ही कंपन्यांमधील हा करार मागील आठवड्यात अंतर्गत घोषित करण्यात आला होता. या करारांतर्गत, टाटा 60 टक्के स्टेक ठेवणार आहेत आणि संयुक्त उपक्रमांतर्गत दैनंदिन कामकाज पाहतील. पेगाट्रॉन उर्वरित भागभांडवल धारण करणार आहे. तसेच तांत्रिक सहाय्य प्रदान करणार असल्याची माहिती आहे.

दोन्ही कंपन्यांमधील वाटाघाटी प्रगत टप्प्यावर

या कराराचा आर्थिक तपशील अद्याप कळलेला नाही. यापूर्वी, रॉयटर्सने एप्रिलमध्ये अहवाल दिला होता की पेगाट्रॉन टाटाला भारतातील आपला एकमेव आयफोन प्रकल्प विकण्यासाठी प्रगत टप्प्यावर चर्चा करत आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील भू-राजकीय तणावादरम्यान अॅपल चीनच्या बाहेर आपली पुरवठा साखळी वैविध्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.

टाटा समूह आयफोनच्या निर्मितीमध्ये विस्तार करत आहे

टाटासाठी, चेन्नई पेगाट्रॉन प्रकल्प त्यांच्या आयफोन उत्पादन योजनांना बळकट करणार आहे. तसेच टाटा समूह आयफोनच्या निर्मितीमध्ये वेगाने विस्तारत आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि पेगाट्रॉन दोन्ही संयुक्त उपक्रमासाठी येत्या काही दिवसांत भारतीय स्पर्धा आयोगाच्या  मंजुरीसाठी अर्ज करणार आहेत.

टाटा समूह कर्नाटकात आयफोन असेंब्ली

सध्या टाटा समूह कर्नाटकमध्ये आयफोन असेंब्ली प्रकल्प चालवत आहे. टाटा समूहाने हा प्रकल्प मागील वर्षी तैवान कंपनी विस्ट्रॉनकडून खरेदी केला होता. याशिवाय तामिळनाडूच्या होसूरमध्ये आयफोन कंपोनंट प्रकल्प आहे. हा समूह होसूरमध्ये आणखी एक प्रकल्प उभारण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.