टाटा स्टीलच्या समभागाचे भविष्य उज्ज्वल
07:00 AM Oct 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : टाटा समूहातील टाटा स्टीलचा समभाग हा येत्या काळात 25 टक्के इतका वाढू शकणार असल्याचा अंदाज ब्रोकरेज फर्म नोम्युरा यांनी व्यक्त केला आहे. सदरचा समभाग गुंतवणूकदारानी खरेदी करायला हरकत नसल्याचा सल्ला फर्मने दिला आहे. सोमवारी बंद झालेल्या समभागाच्या भावानुसार सदरचा समभाग येणाऱ्या काळात 215 रुपयांवर पोहचू शकतो, असे नोम्युराने म्हटले आहे. यासाठी 5 कारणे फर्मने दिली असून देशांतर्गत वाढत्या मागणीनुसार व्यवसायावर लक्ष, कलीनगर कारखान्यात सुधारणा, युरोपातील व्यवसायात वृद्धी, लोहखनिजाची कमी झालेली किंमत याचा लाभ कंपनीला होताना दिसणार असल्याचे फर्मने म्हटले आहे. समाधानकारक मूल्य पाहता कंपनी पुढील काही वर्षात कंपनी भारतात पोलाद क्षेत्रात आघाडीवर राहिल. क्षमता विस्तार, शाश्वतता या गोष्टीही कंपनीला पोषक आहेत.
Advertisement
Advertisement