महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टाटा स्टारबक्स 2028 पर्यंत स्टोअर्सची संख्या करणार दुप्पट

06:08 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

टियर-2 आणि टियर -3 शहरांवर असणार नजर

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

टाटा स्टारबक्स प्रायव्हेट लिमिटेडने भारतात आपल्या स्टोअर्सची संख्या वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने वर्ष 2028 पर्यंत भारतातील स्टोअर्सची संख्या 1,000 पर्यंत वाढवण्याची किंवा दर तीन दिवसांनी एक नवीन स्टोअर उघडण्याची योजना जाहीर केली. याआधी नोव्हेंबरमध्ये कंपनीने दीर्घकालीन ट्रिपल शॉट रिझर्व्हेशन धोरण सादर केले होते. या धोरणाचा संपूर्ण फोकस स्थानिक भागीदारांना कामावर आणणे आणि ग्राहकांना अधिक चांगल्या अनुभवासह सेवा देणारी नवीन स्टोअर सुरू करणे हा आहे. कंपनीला जगभरातील स्टारबक्स ग्राहकांमध्ये भारतीय वंशाच्या कॉफीचा प्रचार करायचा आहे.

भारत महत्त्वाचा देश

4 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनलेला भारत आता जगातील इतर देशांच्या तुलनेत वेगाने वाढत आहे, हे विशेष. 2030 पर्यंत देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचे मानले जाते, ज्यामुळे ते स्टारबक्ससाठी प्रमुख क्षेत्र बनले आहे. भारत स्टारबक्सच्या जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे. या धोरणात्मक महत्त्वामुळे कंपनी येत्या काही दिवसांत भारतात आपली संख्dया दुप्पट करणार आहे.

 कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल

हे लक्षात घेण्याजोगे आहे की, 2012 मध्ये स्टारबक्स कॉफी कंपनी आणि टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड यांच्यातील 50:50 संयुक्त उपक्रमाद्वारे सुरू झालेली टाटा स्टारबक्स आता 54 भारतीय शहरांमध्ये 390 हून अधिक स्टोअर्स चालवते. 2028 पर्यंत स्टोअरची संख्या 1,000 पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट करून 8,600 पर्यंत नेईल. कंपनीची  टियर 2 आणि टियर 3 भारतीय शहरांमध्ये पोहोचण्याची, ड्राईव्ह-थ्रू, विमानतळे आणि सर्वत्र ग्राहकांना सेवा देण्यासाठी 24-तास स्टोअर्सचा विस्तार करण्याची योजना आहे.

या आठवड्यात भारत भेटीवर आलेले स्टारबक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण नरसिंहन म्हणाले, ‘गेल्या 11 वर्षांमध्ये, भारत  स्टारबक्ससाठी जगातील सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ बनली आहे. भारताचा मध्यमवर्ग विस्तारत आहे, त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी मदत करण्यात अभिमान वाटतो. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करताना कॉफी संस्कृती वाढीसाठी येथे पोषक वातावरण आहे. आम्ही भारतात दर तीन दिवसांनी एक स्टोअर उघडणार आहोत आणि व्यवसाय विस्ताराचा वेग वाढवणार आहोत.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article