For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटा सन्सने विकले टीसीएसमधील 2 कोटी समभाग

06:22 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
टाटा सन्सने विकले टीसीएसमधील 2 कोटी समभाग
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

Advertisement

टाटा सन्सने टीसीएसमधील 2 कोटीपेक्षा अधिक समभागांची विक्री केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या समभागांच्या व्यवहारातून 9 हजार कोटी रुपये टाटा सन्सला प्राप्त झाल्याचे कळते.

मंगळवारी शेअरबाजारात ब्लॉक डीलच्या माध्यमातून टाटा समूहातील टाटा सन्सने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमधील जवळपास 2.02 कोटी समभागांची विक्री केली आहे. या बातमीनंतर बाजारात समभाग 3 टक्के घसरणीसह 4021 रुपयांवर खाली आले होते. समभाग विक्रीचा व्यवहार हा प्रति समभाग 4043 रुपये प्रमाणे झाला असून यातून 9 हजार कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. 31 डिसेंबरअखेर टाटा सन्सकडे टीसीएसमध्ये 72.4 टक्के इतकी हिस्सेदारी होती. देशातील सर्वात मोठी दुसऱ्या नंबरची आयटी कंपनी म्हणून टीसीएसचा उल्लेख होतो. जिचे बाजार भांडवल मूल्य 15 लाख कोटी रुपयांचे आहे. टीसीएसच्या आधी सर्वाधिक बाजार भांडवल मूल्यासह रिलायन्स इंडस्ट्रिज अग्रस्थानावर आहे. सध्याला रिलायन्सचे बाजार भांडवल मूल्य 19.47 लाख कोटी रुपये इतके आहे. सदरची वरीलप्रमाणे उभारलेली रक्कम कंपनी कर्ज फेडण्यासाठी तसेच गुंतवणूकीसाठी वापरु शकते, असेही सांगितले जात आहे. मध्यंतरी टाटा सन्सचा आयपीओ लाँच होणार असे ऐकले जात होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.