For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटा सिएराच्या विक्रीला जबरदस्त प्रतिसाद

06:04 AM Mar 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
टाटा सिएराच्या विक्रीला जबरदस्त प्रतिसाद
Advertisement

2 महिन्यात 14 हजार वाहन विक्री : एसयुव्ही गटातील कार :

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्सच्या सिएरा या वाहनाने विक्रीत विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या दोन महिन्यात 14 हजार सिएरांची विक्री नोंदवण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

Advertisement

टाटा मोटर्सची विविध गटात वाहने ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. यातील मध्यम आकाराच्या एसयुव्ही गटातील टाटा सिएराला 2 महिन्यांपूर्वी कंपनीने बाजारात लाँच केले होते. लाँच केल्याच्या दोनच महिन्यात 14 हजार वाहनांची विक्री करण्यात आली आहे. टाटाच्या सिएराची डिलीव्हरी जानेवारीच्या मध्यावर सुरु झाली होती. यानंतर या एसयुव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.  जानेवारी 2026 मध्ये पाहता सिएराची विक्री 7003 इतकी होती. यानंतर फेब्रुवारी महिन्यात 7100 सिएराची विक्री करण्यात आली आहे. यायोगे 2 महिन्यात कंपनीने 14103 सिएरांची विक्री केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 16 डिसेंबर रोजी या नव्या गाडीच्या बुकिंगला सुरुवात झाली होती. तेव्हा त्यादिवशी जवळपास 70 हजार ग्राहकांनी गाडी बुक केली होती.

 उत्पादन वाढवण्यावर भर

बुकिंगला मिळालेला प्रतिसाद पाहून टाटा मोटर्सने वाहन उत्पादन प्रक्रियेला वेग आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. परिणामी ग्राहकांचा वेटींग परियड आता कमी होण्यास मदत होत आहे. येणाऱ्या महिन्यांमध्ये वाहनांची डिलीव्हरी वेगाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरच्या गाडीची किंमत 11.49 लाख रुपये इतकी असून टॉप व्हेरीयंटच्या कारची किमत 21.29 लाख रुपये इतकी आहे.

Advertisement
Tags :

.