टाटा सिएरा 22 वर्षांनंतर आधुनिक लूकसह सादर
नवी दिल्ली : टाटा मोटर्सने भारतीय बाजारात बहुप्रतिक्षित एसयूव्ही सिएरा काही दिवसांपूर्वीच दिमाखात नम्व्याने अनेकविध सुविधांसह लाँच केली आहे. 2003 मध्ये बंद करण्यात आलेली सिएरा ही टाटाची एक प्रतिष्ठित गाडी आहे. आता 22 वर्षांनंतर सिएरा आधुनिक शैली आणि विविध वैशिष्ट्यांसह बाजारात दाखल झाली आहे. या कारमध्ये 360ओ कॅमेरा आणि लेव्हल-2 अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (एडीएएस) सारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह येते. नवीन सिएराची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत आकर्षक अशी 11.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्याचे बुकिंग 16 डिसेंबरपासून सुरू होणार असून 15 जानेवारीपासून डिलिव्हरी दिली जाणार असल्याची माहिती आहे. टाटा एसयूव्हीचे हे मॉडेल बाजारात ह्युंडाई क्रेटा, किया सेल्टॉस, स्कोडा कुशक, फोक्सवॅगन टायगुन, मारुती ग्रँड विटारा, होंडा एलिव्हेट आणि एमजी एस्टरशी स्पर्धा करणार आहे.
बाह्य भाग : नवीन सिएराची रचना 1990 मध्ये सादर केलेल्या त्याच्या पूर्ववर्ती मॉडेलपासून प्रेरित आहे, परंतु कंपनीने एकूण डिझाइन थीम सध्याच्या लाइनअपमधील हॅरियर आणि सफारीप्रमाणेच ठेवली असल्याचे समोर आले आहे. ही आयकॉनिक ‘अल्पाइन विंडो’ डिझाइन असलेली पहिली गाडी आहे, परंतु मूळ सिएरासारखी त्यात सिंगल ग्लास रूफ नसेल, कारण नवीन सिएरा ही 4-दरवाज्यांची आहे. आधुनिकता जपताना फ्लश डोअर हँडल आणि स्टायलिश 19-इंच मल्टी-स्पोक ड्युअल-टोन अलॉय व्हील्स गाडीत देण्यात आले आहेत.
वैशिष्ट्यो : ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि लेव्हल-2 एडीएएस सिएरा एसयूव्ही देखील फीचर लोडेड आहे. यात तीन क्रीन, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, जेबीएल साउंड सिस्टम, व्हेंटिलेशनसह पॉवर्ड फ्रंट सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग आणि पॅनोरमिक सनरूफ आहेत.
इंजिन : यामध्ये 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे 108पीएस पॉवर आणि 145 एनएम कमाल टॉर्क जनरेट करते. या इंजिनसह, 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 7 स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध असेल.