For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटा पंच ईव्हीचे सुधारीत मॉडेल लाँच सुरुवातीची किंमत 9.69 लाख रुपये

06:47 AM Feb 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
टाटा पंच ईव्हीचे सुधारीत मॉडेल लाँच  सुरुवातीची किंमत 9 69 लाख रुपये
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

Advertisement

भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने  भारतीय बाजारात त्यांची नवीन ईव्ही लाँच केली. ही ईव्ही सध्याच्या टाटा पंच ईव्हीचे फेसलिफ्ट मॉडेल आहे. टाटाने बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस (बीएएएस) पर्यायासह टाटा पंच ईव्ही फेसलिफ्ट सादर केली आहे. कंपनीने नवीन पंच ईव्हीमध्ये खास वैशिष्ट्यो जोडली आहेत.

टाटा पंच ईव्ही फेसलिफ्ट किंमत

Advertisement

टाटा पंच ईव्ही फेसलिफ्टची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख रुपये आहे. तथापि, ही किंमत बीएएएस पर्यायासह आहे, म्हणजेच त्यात बॅटरीची किंमत समाविष्ट नाही. बॅटरीसाठी प्रति किलोमीटर 2.6 बॅटरी चार्ज आकारला जाईल. बीएएएस पर्यायाशिवाय टाटा पंच ईव्ही फेसलिफ्टची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9.69 लाख रुपये आहे. तुम्ही नवीन टाटा पंच ईव्ही फेसलिफ्ट सात वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.

फेसलिफ्ट डिझाइन

कंपनीने टाटा पंच ईव्ही फेसलिफ्टच्या लूकमध्ये अनेक बदल केले आहेत. फ्रंट डिझाइन अधिक आधुनिक करण्यात आले आहे. फ्रंट ब्लॅक स्ट्रिप काढून टाकण्यात आली आहे, त्याऐवजी बॉडी-कलर पॅनेल लावण्यात आला आहे. हेडलॅम्पची स्थिती देखील बदलण्यात आली आहे. डीआरएल आता कनेक्ट केलेले आहेत आणि बंपर डिझाइनमध्ये देखील थोडा बदल करण्यात आला आहे. नवीन टाटा पंच ईव्ही फेसलिफ्टमध्ये पुन्हा डिझाइन केलेले 16-इंच अलॉय व्हील्स, नवीन टेललाइट्स आणि टेललाइट्सना जोडणारी लाईट स्ट्रिप देखील आहे.

इंटीरियर, वैशिष्ट्यो

नवीन टाटा पंच ईव्ही फेसलिफ्टचे इंटीरियर पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम बनवण्यात आले आहे. यात 10-इंच टचक्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ही वैशिष्ट्यो आहेत.

Advertisement
Tags :

.