ंटाटा मुंबई मॅरेथॉन 17 जानेवारीला
वृत्तसंस्था, मुंबई
2027 च्या हंगामातील 22 वी टाटा मुंबई मॅरेथॉन 17 जानेवारीला होणार आहे. या प्रतिष्ठेच्या मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आपल्या सहभागाची सर्वप्रथम अधिकृत नोंद केली आहे.
गेली 22 वर्षे मुंबई मॅरेथॉन नियमीतपणे भरविली जाते. जागतिक मॅरेथॉन चळवळीमधील ही प्रतिष्ठेची समजली जाते. या मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटातील पुरुष, महिला स्पर्धक हजारोंच्या संख्येने सहभागी होतात. क्रीडा क्षेत्रातील ताकद, आरोग्य तसेच परोपकारी हे या मॅरेथॉनचे वैशिष्ट्या आहे. मुंबई मॅरेथॉनच्या अधिकृत स्पर्धक नोंदणी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे माहिती तंत्रज्ञान तसेच संस्कृती विभागाचे मंत्री आशिष शेलार हे प्रमुख पाहुणे म्हणून होते. या मॅरेथॉनमध्ये विदेशातील अव्वल धावपटू सहभागी होत असतात. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवर या मॅरेथॉनचे आकर्षण ठरतात. 2027 च्या मुंबई मॅरेथॉनमधील विविध गटातील विजेत्यांसाठी एकूण बक्षीसाची रक्कम 389524 अमेरिकन डॉलर्स राहील. तसेच या मॅरेथॉनला प्रारंभ ऐतिहासिक छत्रपती शिवाजी टर्मिनस (व्हीटी) पासून प्रारंभ होईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या मॅरेथॉनचे प्रमुख पेट्रॉन आहेत.