For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटा मोर्ट्स आता दोन कंपन्यांमध्ये विभागणार

06:29 AM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
टाटा मोर्ट्स आता दोन कंपन्यांमध्ये विभागणार
Advertisement

भागधारकांनी  दिली प्रस्तावाला मान्यता

Advertisement

मुंबई :

टाटा मोटर्सचे प्रवासी वाहन आणि व्यावसायिक वाहन व्यवसाय हे दोन्ही वेगळे केले जाणार आहेत. टाटा मोटर्सने नुकतेच सांगितले की, त्यांच्या भागधारकांनी कंपनीचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याची योजना मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत, आता टाटा मोटर्स दोन स्वतंत्र सूचीबद्ध कंपन्यांमध्ये विभागली जाणार आहे. यामध्ये एक कंपनी प्रवासी वाहनांचा व्यवसाय हाताळेल आणि दुसरी व्यावसायिक वाहने हाताळेल.

Advertisement

जग्वार लँड रोव्हरचा विभाग प्रवासी वाहनांमध्येच

टाटा मोटर्सने मार्च 2024 मध्ये हे विभाजन प्रस्तावित केले होते. कंपनीने म्हटले आहे की यामुळे दोन्ही व्यवसायांना वेगळे लक्ष केंद्रित करता येईल आणि वाढीसाठी चांगल्या संधी निर्माण होतील. प्रवासी वाहन विभागात कंपनीचा लक्झरी ब्रँड जग्वार लँड रोव्हर देखील समाविष्ट असेल, जो कंपनीचा सर्वाधिक कमाई करणारा ब्रँड आहे. हा प्रस्ताव समभागधारकांनी जवळजवळ एकमताने मंजूर केला आहे. एक्सचेंज फाइलिंगनुसार, या योजनेच्या बाजूने 99.9995 टक्के मते पडली. विभाजनानंतर प्रत्येक भागधारकाला दोन्ही नवीन कंपन्यांमध्ये समान हिस्सा मिळेल.

टाटा मोटर्सचे प्रवासी आणि व्यावसायिक वाहन व्यवसाय आता स्वतंत्र सूचीबद्ध कंपन्या बनतील. ज्यांचे बोर्ड, धोरणे आणि लक्ष वेगवेगळे असेल. यामुळे या दोन्ही क्षेत्रांमध्ये येणाऱ्या काळात जलद विकासाची शक्यता निर्माण होईल. या बातमीनंतर, टाटा मोटर्सचे समभाग 6 टक्क्यांनी वाढले.

Advertisement
Tags :

.