For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटा मोटर्स इलेक्ट्रीक वाहनांची संख्या वाढवणार

06:09 AM Jun 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
टाटा मोटर्स इलेक्ट्रीक वाहनांची संख्या वाढवणार
Advertisement

2030 पर्यंत 30 टक्के हिस्सेदारी : चेअरमन चंद्रशेखरन यांची माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

दिग्गज ऑटो क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्सच्या ताफ्यात 2030 पर्यंत इलेक्ट्रीक वाहनांची हिस्सेदारी 30 टक्के इतकी असणार असल्याचा अंदाज कंपनीचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी व्यक्त केला आहे.  इलेक्ट्रीक वाहनांच्या संख्येत वाढ करण्याप्रती कंपनी प्रतिबद्ध असून दुर्मिळ खनिजांच्या कमतरतेवरही लक्ष केंद्रीत केले जात आहे. यासंदर्भात इतरपर्यायांवरही विचार केला जातआहे.

Advertisement

चिंता करण्याची गरज नाही

कंपनीची वार्षिक सर्वसाधारण बैठक नुकतीच पार पडली. त्यात एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दुर्मिळ खनिजाच्या अपुऱ्या पुरवठ्यावर बोलताना चंद्रशेखरन यांनी उपस्थितांना काळजी करण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे. आम्ही आपल्या गरजेनुसार दुर्मिळ खनिजांची मागणी नोंदवू. साठाही असून त्याचेही नियोजन कंपनीने केले आहे. सरकारसोबत इतर पर्यायांबाबत चर्चा करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

ऑटो कंपन्या काळजीत

चीनने दुर्मिळ खनिजांवर बंदी घातल्यामुळे ऑटो कंपन्यांपुढे संकटाचे ढग तयार झाले आहेत. दुर्मिळ खनिजांचा वापर पाहता मोटर व बॅटरी या भागांमध्ये केला जातो. हे दोन्ही भाग इलेक्ट्रीक वाहनांमध्ये हमखास वापरले जातात. त्यामुळे आर्थिक वर्ष 2026 मध्ये इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीवर तात्काळ तरी परिणाम होणार नसल्याचे इंडिया रेटिंग अँड रिसर्च यांनी म्हटले आहे. खनिजांचा पुरवठा प्रभावित झाल्यास पुढे पेट्रोल, डिझेल इंधनावरील वाहने, इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनावर परिणाम जाणवू शकतो. या खनिजांची आयात दीर्घकाळ थांबली तर इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीवर थेटपणे परिणाम होऊ शकतो. इलेक्ट्रीक वाहनांचा टाटाचा सध्याचा वाटा 15 टक्के असून तो 2030 पर्यंत 30 टक्क्यांवर नेला जाणार आहे, असे चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.