For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रीन मोबिलिटीसाठी टाटा मोटर्स-टाटा पॉवर यांच्यात हातमिळवणी

06:36 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
ग्रीन मोबिलिटीसाठी टाटा मोटर्स टाटा पॉवर यांच्यात हातमिळवणी
Advertisement

जवळपास शून्य ऑपरेटिंग खर्च व कमी कार्बन फूटप्रिंटसाठी प्रयत्न

Advertisement

नवी दिल्ली :

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रीक मोबिलिटी आणि टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी यांनी भारतात इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) आणि सौरऊर्जेच्या अवलंबनाला गती देण्यासाठी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. जवळपास शून्य ऑपरेटिंग खर्च आणि कमी कार्बन फूटप्रिंट करीता ईव्ही आणि सोलर रूफटॉप सिस्टीममध्ये समन्वय निर्माण करणे हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे.

Advertisement

यांचे सर्व कौशल्य एकत्र करून, टाटा समूहाच्या दोन कंपन्या सर्वसमावेशक उपाय प्रदान करतील ज्यात इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी आणि सौर रूफटॉप सिस्टीमची स्थापना यांचा समावेश आहे. या एकात्मिक पद्धतीमुळे ईव्ही मालकीच्या एकूण खर्चात लक्षणीय घट होण्याची अपेक्षा आहे. यामुळे सौरऊर्जा गुंतवणुकीसाठी परतावा कालावधी देखील वाढेल.

टीपीईएमएल आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणाले, ‘भारताचा निव्वळ शून्याकडे प्रवास केवळ ईव्ही आणि अक्षय ऊर्जेच्या वापरातूनच होऊ शकतो. आम्हाला एकत्रितपणे शून्य-उत्सर्जन मोबिलिटीचे उद्दिष्ट साकारायचे आहे आणि ग्राहकांसाठी ऑपरेटिंग खर्च कमी करायचा आहे.

उल्लेखनीय आहे की केंद्र सरकारने पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेंतर्गत एक कोटी कुटुंबांना अनुदानित सोलर रूफटॉप सिस्टीम बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ईव्ही आणि सौरऊर्जेच्या पूरक स्वरूपावर भर देताना, टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा म्हणाले, ‘हे उपाय पर्यावरणपूरक आणि मूल्य-सजग ग्राहकांच्या समान संचाला आकर्षित करतात. हे सहकार्य रूफटॉप सिस्टीम आणि ईव्ही अधिकाधिक अवलंब करण्यास प्रोत्साहन देईल आणि विवेकी ग्राहकांसाठी पैसे वाचवताना उत्सर्जन कमी करण्यास हातभार लावणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला आहे’.

टाटा पॉवर सोलर रूफटॉप क्षेत्रात आघाडीवर

टाटा पॉवर सोलर रूफटॉप क्षेत्रात आघाडीवर असून, देशभरात 700 हून अधिक चॅनल भागीदारांचे मजबूत नेटवर्क आहे. कंपनीने आधीच 1,00,000 पेक्षा जास्त ग्राहकांसाठी सौर यंत्रणा बसवली आहे. टाटा पॉवरकडे देशभरात 5,600 सार्वजनिक चार्जर्ससह विस्तृत ईव्ही चार्जिंग नेटवर्क असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.