टाटा मोटर्सचा समभाग घसरणीत
07:00 AM Nov 11, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्सचा समभाग गुरुवारी शेअरबाजारात 5 टक्के इतका घसरणीत होता. सदरची घसरण ही टाटा मोटर्सला सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये निव्वळ तोटा सहन करावा लागल्याच्या कारणास्तव दिसून आली. कंपनीचा समभाग गुरुवारी बीएसईवर 5 टक्के घसरत 409 रुपयांवरती स्थिरावला होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीने 944 कोटींचा तोटा सहन केला आहे. कंपनीचा महसूल याच कालावधीत 30 टक्के वाढून 78 हजार 846 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article