ऑक्टोबरमध्ये टाटा मोर्ट्सची विक्री किरकोळ घसरली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा मोटर्सची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विक्री ऑक्टोबरमध्ये किरकोळ घसरून 82,682 युनिट्सवर आली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 82,954 युनिट्स होती. एकूण देशांतर्गत विक्री गेल्या महिन्यात 80,839 युनिट्सवर पोहचली. जी एका वर्षापूर्वी याच कालावधीत 80,825 युनिट होती, असे टाटा मोटर्सने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
इलेक्ट्रिक वाहनांसह एकूण प्रवासी वाहन विक्री ऑक्टोबर 2023 च्या 48,637 युनिट्सच्या तुलनेत किरकोळ घटून 48,423 युनिट्सवर आली. त्याचप्रमाणे देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्रीही घसरून 48,131 युनिट्सवर आली आहे, जी एका वर्षापूर्वी याच महिन्यात 48,337 युनिट्स होती, असे कंपनीने म्हटले आहे. टाटा मोटर्सने सांगितले की, गेल्या महिन्यात त्यांची एकूण व्यावसायिक वाहनांची विक्री ऑक्टोबर 2023 मध्ये 34,317 युनिट्सच्या तुलनेत 34,259 युनिट्सवर होती.