टाटा मोटर्स पीव्हीचा समभाग नुकसानीत
06:27 AM Mar 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्स पीव्हीचा समभाग शुक्रवारी एका बातमीमुळे घसरणीत राहिलेला दिसून आला. युकेमधील जग्वार लँड रोवरचे उत्पादन थांबवण्यात आल्याची बातमी शेअरबाजारात धडकली. सदरचे उत्पादन तात्पुरते थांबवले असल्याचेही कंपनीने नंतर स्पष्ट केले आहे. समभाग सकाळी 2 टक्के घसरणीसोबत 312 रुपयांवर उघडला होता पण नंतर 5.3 टक्के इतका घसरत 301 रुपयांवर आला. 52 आठवड्यानंतर समभागाने नीचांकी स्तर गाठला होता. जवळपास 80 लाख समभागांमध्ये व्यवहार झाल्याचे समजते. याआधीच्या दोन सत्रात समभाग तेजीवर स्वार होता. याचदरम्यान समभाग दोन दिवसात 4.5 टक्के इतका वाढला होता.
Advertisement
Advertisement