टाटा मोटर्सचा नफा घटला
वृत्तसंस्था/मुंबई
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्सचा आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीचा निकाल झाहीर झाला असून नफ्यात 22 टक्के घट दिसली आहे. सदरच्या तिमाहीत कंपनीने 5451 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. एक वर्षापूर्वी समान अवधीत कंपनीने 7025 कोटी रुपयांचा नफा प्राप्त करण्यात यश मिळवलं होतं. ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये कंपनीने 11.36 लाख कोटी रुपयांचा महसुल प्राप्त केला आहे जो एक वर्षापूर्वी याच अवधीत 11.06 लाख कोटी रुपये इतका होता. वर्षाच्या आधारावर महसुलात 2.71 टक्के इतकी वाढ दिसली आहे. याच तिमाहीत टाटा मोटर्सच्या एकुण उत्पन्नात वर्षाच्या आधारावर 3 टक्के वाढ दिसली आहे. 11.54 लाख कोटींचे उत्पन्न कंपनीने प्राप्त केले आहे.
समभाग घसरला
याचदरम्यान कंपनीचे समभाग गुरुवारच्या सत्रात 9 टक्के इतके घसरणीत राहिले होते. समभाग एकावेळी 9 टक्के इतके घसरत 684 च्या स्तरावर कार्यरत होते. अशाप्रकारे समभाग 52 आठवड्यानंतर नीचांकी स्तरावर आला होता. याआधी बुधवारच्या सत्रात निकालाआधी समभाग 3.65 टक्के तेजीसोबत 754 च्या स्तरावर बंद झाले होते. एक महिन्यात समभाग 2.88 टक्के वाढला आणि 6 महिन्यात 32 टक्के घसरणीत होता. वर्षभरात समभाग 10 टक्के घसरला आहे. टाटा मोटर्सचे बाजार भांडवल मूल्य 2.77 लाख कोटी रुपये इतके आहे.