For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जुलैपासून वाढणार टाटा मोटर्सच्या किंमती

06:01 AM Jun 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
जुलैपासून वाढणार टाटा मोटर्सच्या किंमती
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्स आपल्या वाहनांच्या किंमती 1 जुलैपासून पुन्हा वाढविणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाटा मोटर्सच्या मॉडेल्सच्या किंमती 10 ते 30 हजारपर्यंत वाढू शकतात.

याआधी वाढल्या किमती

Advertisement

यावर्षी भारतात काही हजार रुपयांपासून ते 30 हजार रुपयांपर्यंत कार्सच्या केंमती वाढलेल्या आहेत. लक्झरी गटातील कार्सच्या किंमती तर काही लाखांपर्यंत वाढल्या आहेत. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती व परिणामी उत्पादन खर्चामध्ये झालेली वाढ यामुळे कंपन्यांना आपल्या वाहनांच्या किंमती वाढविणे गरजेचे वाटते आहे.

मॉडेलनुसार वाढ

टाटा मोटर्स 1 जुलैपासून प्रवासी वाहने जी पेट्रोल, डिझेलसह इलेक्ट्रिक इंधनावर आहेत, त्यांच्या किंमती वाढणार आहेत. यांच्या किंमती दीड टक्क्यांपर्यंत वाढू शकतात, असे सांगितले जात आहे.

Advertisement
Tags :

.