For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटा मोर्ट्सला 3,486 कोटींचा तोटा

06:28 AM Feb 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
टाटा मोर्ट्सला 3 486 कोटींचा तोटा
Advertisement

ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीमधील आकडेवारी

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

आर्थिक वर्ष 26 च्या तिसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सला 3,486 कोटींचा एकत्रित तोटा झाला. कंपनीने गेल्या वर्षी याच तिमाहीत 5,406 कोटींचा नफा नोंदवला होता. जॅग्वार लँड रोव्हर (जेएलआर) च्या व्यवसायावर सायबर हल्ल्यांचा आणि चिनी बाजारपेठेतील मंदीचा विपरीत परिणाम झाला आहे, ज्यामुळे कंपनीच्या एकूण महसूलात आणि नफ्यात घट झाली आहे.

Advertisement

तिमाहीत महसूल 26 टक्क्यांनी घसरला

टाटा मोटर्सचा ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल वर्षाच्या आधारावर 26 टक्क्यांनी घसरून तो 70,108 कोटींवर आला. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो सुमारे 94,738 कोटी होता. सायबर हल्ल्यामुळे जेएलआरचा महसूल 39 टक्क्यांनी प्रभावीत होत तो सुमारे 55,000 कोटींवर आला, असे कंपनीने म्हटले आहे. चीनी बाजारपेठेत मंदी आणि इतर कारणे जेएलआरच्या विक्रीत घट होण्याची सांगितली जात आहेत. जुन्या मॉडेल्सचे उत्पादन हळूहळू बंद केल्याने व्हॉल्यूमवर परिणाम झाला.

अमेरिकेत वाढलेल्या शुल्कामुळे नफ्यावरही दबाव

देशांतर्गत बाजारात कार विक्री 22 टक्क्यांनी वाढली. जेएलआरच्या खराब कामगिरीच्या उलट, टाटा मोटर्सच्या भारतीय व्यवसायाने मजबूत पकड कायम ठेवली आहे. उएऊ दरांमध्ये कपात केल्याने देशांतर्गत प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहन विक्री 22 टक्क्यांनी वधारुन 1.71 लाख युनिट्सवर पोहोचली आहे.

चौथ्या तिमाहीत चांगली पुनर्प्राप्ती होईल असा विश्वास सीएफओला आहे. टाटा मोटर्सचे सीएफओ धीमान गुप्ता म्हणाले, सायबर हल्ल्यांमुळे हा तिमाही अपेक्षेप्रमाणे आव्हानात्मक राहिला आहे. तथापि, देशांतर्गत व्यवसायात सुधारणा दिसून आली आहे.

Advertisement
Tags :

.