टाटा मोटर्सला मिळाले इंडोनेशियातून कंत्राट
70 हजार वाहनांचा पुरवठा करण्याचा निर्धार
मुंबई :
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्स यांना अलीकडेच इंडोनेशियातून वाहनांची ऑर्डर नोंदविण्यात आली आहे. यापूर्वी महिंद्रा आणि महिंद्रा यांना वाहनांची ऑर्डर प्राप्त झाली होती.
टाटा मोटर्स इंडोनेशियाला येत्या काळामध्ये 70 हजार वाहनांचा पुरवठा करणार आहे. यापूर्वी महिंद्रा आणि महिंद्राला 35 हजार वाहनांचा पुरवठा करण्याची ऑर्डर प्राप्त झाली होती. इंडोनेशियातील पीटी अॅग्रीनास पँगॅन नुसानतारा या विक्रेत्यांकडे टाटा मोटर्स वाहने सुपूर्द करणार आहे. टाटा मोटर्स ही व्यावसायिक वाहन उद्योगातील सर्वात मोठी कंपनी असून 35 हजार योद्धा ही पिकअप वाहने करारातंर्गत इंडोनेशियाला पाठवणार आहे. यासोबत अल्ट्रा हे ट्रक देखील इंडोनेशियाला पाठविले जाणार आहेत.
पॅसेंजर वाहनांच्या किंमती वाढणार
याच दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार टाटा मोटर्स येत्या काळात आपल्या पॅसेंजर वाहनांच्या किंमती वाढवणार आहे. उत्पादन खर्चामध्ये झालेल्या वाढीमुळे कंपनीला किमत वाढीचा निर्णय घ्यावा लागला आहे. मारुती सुझुकी ही कंपनीसुद्धा दर वाढविण्याबाबत विचार करीत असल्याचे सांगितले जात आहे. ह्युंडाई मोटर इंडिया यांनी जानेवारीतच आपल्या वाहनांच्या किंमती वाढविल्या आहेत. किंमती वाढविण्याबाबत टाटा मोटर्सवर दबाव वाढत असून दर येत्या काही आठवड्यात याबाबत निर्णय होईल.