For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटा मोटर्सची इलेक्ट्रिक सिएरा लवकरच बाजारात

06:56 AM Jun 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
टाटा मोटर्सची इलेक्ट्रिक सिएरा लवकरच बाजारात
Advertisement

 एसयुव्ही गटात होणार दाखल : सातवी इव्ही कार

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्स लवकरच आपली नवी टाटा सिएरा ही इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात उतरविणार आहे. सदरची कार ही 30 जून रोजी लाँच केली जाणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. एसयुव्ही गटातील ही कार ड्युअल मोटर क्वाड व्हिल ड्राईव्ह या प्रकारात येणार आहे. टाटा कंपनीची ही बाजारात लाँच होणारी 7 वी इव्ही कार असणार आहे. या आधी कंपनीने इलेक्ट्रिक गटामध्ये पंच, टिगोर, टियागो, नेक्सन या गाड्या सादर केल्या आहेत.

Advertisement

विविध वैशिष्ट्यो

टाटा सिएराचे डिझाईन नव्याने आकर्षक बनविण्यात आले असून पेट्रोल, डिझेल सारख्या मॉडेलप्रमाणेच ही गाडी असणार आहे. समोरच्या बाजुला स्लिम एलईडी हेडलॅम्प दिले जाणार आहेत. मागच्या बाजुलादेखील कनेक्टेड टेल लाईट्स दिले जाणार असून 19 इंचाचे अलॉयव्हिल दिले जाणार आहेत. अनेक आधुनिक फिचर्सचा समावेश या कारमध्ये करण्यात आलेला आहे. ट्रिपल स्क्रिन लेआऊट डिस्प्लेसह 10.25 इंचाचा डिजिटल इन्स्ट्यूट क्लस्टर दिला जाणार आहे.

याही सुविधा

ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, जेबीएलचे 12 ऑडिओ स्पिकर, डॅशबोर्ड इंटीग्रेटेड साऊंड बार, डॉल्बी अॅटमॉस साऊंड प्रणाली, व्हेन्टीलेटेड सिट्स तसेच पॅनारॉमिक सनरुफ या सारख्या सुविधाही दिल्या जाणार आहेत. सदरची कार भारत एन कॅप क्रॅश चाचणीमध्ये सुरक्षिततेच्या बाबतीत 5 स्टार मिळविणारी ठरली आहे.

Advertisement
Tags :

.