For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटा मोटर्सच्या कार्स पुन्हा होणार महाग

06:28 AM Sep 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
टाटा मोटर्सच्या कार्स पुन्हा होणार महाग
Advertisement

1 ऑक्टोबरपासून वाढणार किमती : तिसऱ्यांदा होणार वाढ

Advertisement

वृत्तसंस्था, कोलकाता

टाटा मोटर्सची व्यावसायिक वाहने खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर सावधान, लक्षात घ्या कंपनी वाहनांच्या किमती वाढवणार आहे. टाटा मोटर्स कमर्शिअल व्हेइकल्सने पुन्हा एकदा आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून व्यावसायिक वाहनांच्या किमती 1 टक्क्यांपर्यंत वाढणार आहेत.

Advertisement

कंपनीने किमती वाढवण्यामागे अंतर्गत खर्चात वाढ झाल्याचे कारण सांगितले आहे. टाटा मोटर्सचे म्हणणे आहे की, या वाढीद्वारे खर्चातील वाढीचा काही भाग भरून काढला जाईल. ट्रक, बस, मिनी ट्रक, पिकअप आणि इतर व्यावसायिक वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो.

यापूर्वीही किमती वाढल्या

टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांची 2026 मध्ये झालेली ही तिसरी दरवाढ आहे. याआधी कंपनीने 1 एप्रिल 2026 पासून व्यावसायिक वाहनांच्या किमती 1.5 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. 1 जुलै 2026 पासून संपूर्ण व्यावसायिक वाहनांच्या किमती 2.5 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. त्यावेळीही वाहननिर्मितीच्या अंतर्गत खर्चात झालेली वाढ हे कारण सांगितले होते. मॉडेल आणि प्रकारानुसार वाढ वेगळ्या पद्धतीने लागू केली गेली. अशाप्रकारे एप्रिल, जुलै आणि आता ऑक्टोबरमध्ये व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवल्या जात आहेत.

Advertisement
Tags :

.