‘टाटा’ च्या नव्या तीन कार लाँच
सुरुवातीची किंमत 4.99 लाख रुपये : अनेक फिचर्सचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपल्या ग्राहकांसाठी तीन नवीन कार लाँच केल्या आहेत. या तीन्ही कार टाटा टियागो, टाटा टियागो ईव्ही आणि टाटा टिगोरच्या अपडेटेड कार आहेत. नवीन वर्षासाठी कंपनीने तिन्ही कारमध्ये नवीन रंग पर्याय, नवीन तंत्रज्ञान आणि नवीन डिझाइन जोडले आहे.
कारसाठी बुकिंग सुरू केले आहे. अधिकृत वेबसाइटद्वारे कार सहजपणे बुक करता येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. टाटा टियागो 2025 पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. त्याच वेळी, टाटा टिगोर 2025 पेट्रोल आणि सीएनजीमध्ये सादर करण्यात आली आहे.
टाटा टियागो
टियागोची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत फक्त 4.99 लाखांपासून सुरू होते. एलईडी हेडलाइट्स, डीआरएल थोडेसे अपडेट केले आहेत.
टाटा टियागो ईव्ही
टाटा टियागो ईव्हीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत फक्त 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीने कारमध्ये काही बदल केले आहेत. दारांवर एलईडी हेडलाइट्स, इंटीरियरमध्ये नवीन अपहोल्स्ट्री आहे आणि ड्रायव्हर डिस्प्ले अपडेट करण्यात आला आहे. टाटा टिगोरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपये आहे. या कारचा बाह्य भाग कंपनीने बदलला आहे.