टाटाची ‘अल्ट्रोज आयसीएनजी’लाँच
किंमत 9 लाखांपेक्षाही कमी : सीएनजीमधील नवीन एएमटी व्हर्जनचा समावेश
वृत्तसंस्था,नवी दिल्ली
भारतीय वाहन बाजारात सीएनजी वाहनांची वाढती मागणी लक्षात घेऊन, प्रसिद्ध कार निर्माता टाटा मोटर्सने आपली लोकप्रिय प्रीमियम हॅचबॅक कार टाटा अल्ट्रोज आयसीएनजीचे नवीन एएमटी मॉडेल सादर केले आहे. यामध्ये विशेष म्हणजे, टाटा अल्ट्रोज आता फॅक्टरी-फिटेड सीएनजीसह एएमटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेली देशातील पहिली आणि एकमेव प्रीमियम हॅचबॅक ठरली आहे.
नवीन टाटा अल्ट्रोजची किंमत
नवीन टाटा अल्ट्रोज आयसीएनजीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8.69 लाख रुपये आहे. कंपनीने ही गाडी एकूण पाच प्रकारांमध्ये सादर केली आहे. यामध्ये प्युअर, प्युअर एस, क्रिएटिव्ह, क्रिएटिव्ह एस आणि अकम्प्लिश्ड एस व्हेरिएंटचा समावेश आहे. या व्हेरिएंटमध्ये एक्स-शोरूम किंमत साधारणपणे अशी आहे.
आयसीएनजी इंजिन आणि परफॉर्मन्स
नवीन अल्ट्रोज आयसीएनजी एएमटीमध्ये 1.2-लिटर रेवोट्रॉन आयसीएनजी इंजिन आहे. हे इंजिन सीएनजी मोडमध्ये 73.5 पीएस पॉवर आणि 103 एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन पहिल्यांदाच एएमटी गिअरबॉक्ससोबत जोडले आहे, ज्यामुळे शहरातील ड्रायव्हिंग पूर्वीपेक्षा अधिक सोपे आणि आरामदायक झाले आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, यात एक प्रगत इसीयु प्रणाली आहे, ज्यामुळे पेट्रोल आणि सीएनजी मोडमध्ये सहजपणे स्विच करता येते. याशिवाय, कारमध्ये डायरेक्ट सीएनजी स्टार्ट फीचर देखील आहे, म्हणजेच कार थेट सीएनजी मोडमध्ये सुरू करता येते.
सुरक्षेबद्दल
सुरक्षेबद्दल बोलायचे झाल्यास, टाटा अल्ट्रोजला इंडिया एनसीएपीमध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. हे रेटिंग पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी आवृत्त्यांना लागू आहे. या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, ईएसपी (इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम), आयएसओफिक्स चाइल्ड सीट माउंट्स आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स हे स्टँडर्ड म्हणून मिळतात.
ठळक बाबी...
प्युअर 8.69 लाख रुपये
प्युअर एस 8.99 लाख रुपये
क्रिएटिव्ह 9.56 लाख रुपये
क्रिएटिव्ह एस 9.81 लाख रु.
अकम्प्लि एमड 10.76 लाख रु.